breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत सुरू, पवारांसह सर्व बड्या नेत्यांची उपस्थिती

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत 15 -16 लोकसभा मतदारसंघातील पक्षातील नेत्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. माढामधून लढण्याचा अंतिम निर्णय आजच्या बैठकीनंतर शरद पवार जाहीर करू शकतात.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यानुसार दोन्ही पक्षात 26- 22 चा फॉर्म्यूला ठरल्याची माहिती आहे. तसेच दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना प्रत्येकी 4- 4 जागा सोडू शकतात अशी माहिती आहे. यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 4 तर राजू शेट्टींना एक, डाव्या पक्षांना एक, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक तर कवाडे-गवई गटाला एक जागा सोडण्याची शक्यता आघाडीतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाआघाडी बनविण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून बुधवारी (ता. 13) दिल्लीतील त्यांच्या 6, जनपथ या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांसोबत पवारांनी खलबतं केली. त्यानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर लागलीच आपल्या पक्षातील नेत्यांना मुंबईत बोलवून घेत उमेदवारीबाबत चर्चा सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button