breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं, पुन्हा असं करणार नाही’; शरद पवारांचे मोठं विधान

अजित पवारांना पुन्हा संधी नाही - शरद पवार

सातारा : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांना पुन्हा पक्षात संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते साताऱ्यातील दहिवडी येथे माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर एकदा एखादी भूमिका घेतली असेल करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, असं सांगतााच पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – ‘कुठलंही बटण दाबा, मत भाजपालाच मिळणार’; भाजप खासदाराचा दावा!

पक्षात फूट नाही तर मग निवडणूक आयोगाकडे का गेलात? असा सवाल केला असता ते म्हणाले, आम्ही कारवाईची मागणी केली. तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी सकाळी बारामतीत अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असं म्हटलं आहे. तर त्यांच्या या विधानाला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी दुजोरा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button