breaking-newsआंतरराष्टीय

मुशर्रफ यांच्यावर कारवाईचा बडगा; ओळखपत्र, पारपत्र स्थगित

इस्लामाबाद – पाकिस्तानी न्यायालयाच्या आदेशावरून त्या देशाचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पारपत्र (पासपोर्ट) स्थगित करण्यात आले आहे.

पाकिस्तानात 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्याबद्दल मार्च 2014 मध्ये मुशर्रफ यांच्याविरोधात विशेष न्यायालयात देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले. त्यानंतर मार्च 2016 ला वैद्यकीय उपचारांच्या कारणास्तव मुशर्रफ दुबईला रवाना झाले. काही महिन्यांनंतर विशेष न्यायालयाने त्यांना फरार जाहीर केले. आता अलीकडेच न्यायालयाने मुशर्रफ यांचे ओळखपत्र आणि पारपत्र स्थगित करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पाऊले उचलल्याचे समजते. पारपत्र स्थगित झाल्याने मुशर्रफ इतर कुठल्याच देशात जाऊ शकत नाहीत. याशिवाय, दुबईमधील त्यांचे वास्तव्यही अवैध ठरेल.

आता त्यांना राजकीय आश्रय घेणे भाग पडेल किंवा पाकिस्तानात परतण्यासाठी विशेष कागदपत्रांची व्यवस्था करावी लागेल. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधीत पाकिस्तानवर सत्ता गाजवली. देशद्रोहाबरोबरच माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या आणि इतर विविध प्रकरणांत त्यांना आरोपी करण्यात आले आहे. पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपात दोषी ठरल्यास मृत्यूदंडाची किंवा जन्मठेपेची तरतूूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button