breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मल्टिप्लेक्‍स चालकांची राज ठाकरेशी चर्चा

मुंबई – मनसेने राज्यभरातील मल्टिप्लेक्‍स विरोधात सुरु केलेले आंदोलन यशस्वी झाल्याचे चित्र आहे. या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे अखेरीस या मल्टिप्लेक्‍स चालकांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरातील मल्टिप्लेक्‍स थिएटरमध्ये सुरु असलेल्या अवाजवी दरांतील खाद्यपदार्थ विक्रीला विरोध करत “खळ्ळखटॅक स्टाईल’मध्ये आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असे आश्वासन थिएटर चालकांनी राज ठाकरे यांना दिले आहे. यात पाण्याची बाटली, समोसा, पॉपकॉर्न, वडापाव अशा सर्वसामान्यांच्या पसंतीच्या पदार्थांचा समावेश असेल.

हे दर येत्या दोन ते तीन दिवसात कमी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशाराही मनसेने दिला आहे. राज्यातील सगळ्या मल्टिप्लेक्‍सचे सीईओंनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मध्यंतरी मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही का? 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रूपयात विकण्याचा अधिकार कोणी दिला, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले होते. याच पार्श्‍वभूमीवर मनसेने पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button