breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

मुकेश अंबानींच्या कंपनीचेही 1 लाख कोटी रुपये बुडाले; दोन दिवसांत शेअर्स 7 टक्क्यांनी कोसळले

मुंबई | प्रतिनिधी 
मंगळवारी BSE चा म्हणजेच शेअर बाजाराचा कारभार सुरू झाल्यानंतर त्या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर तीन टक्के वाढून 2305 रूपये प्रति शेअर एवढा त्यांचा दर झाला. गेल्या दोन सत्रात कंपनीच्या शेअर्स 7 टक्क्यांनी कोसळले होते. RIL ची सहाय्यक कंपनी रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेडद्वारे शापूरजी पलोनजी कंपनीला दिलेल्या 750 कोटी रूपयांच्या लोनबाबत स्पष्टीकरण देऊनही शेअर कोसळत होते.

रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये गेले काही दिवस घसरण झाली आहे. गेल्या दोन सत्रात मार्केट कॅपिटलायझेशन मध्येही 1.17 लाख कोटींची घसरण झाली आहे. BSE मध्ये 10.30 वाजता कंपनीच्या शेअर्स मध्ये 2.4 टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे 2321 रूपये प्रति शेअर असं ट्रेंड होत होतं. या दरम्यान S&P BSE सेन्सेक्समध्ये 0.47 टक्के घसरण झाली. BSE Data नुसार कंपनीची मार्केट कॅप 15.69 लाख कोटी रूपयांवर आहे.

कंपनीने शेअर बाजाराला हे सांगितलं की आहे नॉन बॅकिंग फायनान्शिअल कंपनीच्या रूपात RVL द्वारे Sterling and Wilson Private Limited ला देण्यात आलेल्या लोनबाबत LODR च्या रेग्युलेशन 30 च्या अंतर्गत यासाठी कोणत्याही Disclosure ची आवश्यकता नाही. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीने हे सार्वजनिक केलेलं नाही.

रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) ने 10 ऑक्टोबर 2021 ला Sterling and Wilson Renwable Energy Limited सोबत एक करार केला होता. RNEL च्या या कराराअंतर्गत SWREL च्या 40 टक्के वाट्याचं अधिग्रहण करणार आहे.

शेअर बाजारात सलग पाच दिवस झालेल्या घसरणीमुळे एकूण 3600 हून अंकांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यातही सलग चार दिवसांच्या घसरणीत सेन्सेक्स 2271 अंकांनी घसरला होता. आजची 1400 हून अधिक अंकांची घसरण पाहिली तर बाजारात एकूण 3600 हून अधिक अंकांची घसरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातील सेन्सेक्सच्या घसरणीत बुधवार आणि गुरुवारी अनुक्रमे 656 अंक आणि 634 अंकांनी तुटला होता. बाजार भांडवल एका आठवड्यात 18 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. कारण गेल्या सोमवारी ते 280 लाख कोटी रुपये होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button