breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षण ; आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दगडफेकीत रोहन तोडकर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी दुपारनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. कोपरखैरणेतही हिंसाचार करत दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये रोहन तोडकर जखमी झाला.

उपचारासाठी रोहन तोडकरला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा करणाऱ्या ५६ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही परप्रांतीय असल्याचं समोर आलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button