breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे हीच लढाई – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई | कुणी म्हंटले कोरोनाशी लढा देता येत नाही म्हणून मी लढतो आहे तुम्ही सुद्धा लढा माझ्यासोबत असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यु पाळण्याचं आवाहन केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या घरातच राहून जनता कर्फूचे पालन केले आहे.
त्या निमित्ताने त्यांनी घरात स्वयंपाक सुद्धा बनवला आहे. तसेच कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी नागरिकांनी काही दिवस घरातच बसावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना व्हायरसबाबत बोलतांना त्यांनी म्हंटल आहे की कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे हीच लढाई आहे. सर्वांनी ती पाळली पाहिजे काही दिवस आपण घरी बसून लढा दिला तर आपण नक्कीच कोरोनासोबत जिंकू शकतो असंही ते म्हणाले आहेत