breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चं केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतूक…

 बॉलिवूडमध्ये कायम निरनिराळ्या भूमिकांना प्राधान्य देणारा अभिनेता आयुष्मान खुरानाचा आणखी एक वेगळा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ 21 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा एक गे म्हणजे समलिंगी रोमान्स-कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाने फक्त प्रेक्षकांनाच नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही प्रभावित केलं आहे.या चित्रपटाची दखलं स्वत:हा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे…

या सिनेमाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी मोहीम चालवणाऱ्या पीटर यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर या सिनेमाबाबत ट्विट केलं, यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केलं आहे.

“बॉलिवूडचा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गे कपलला रोमान्स करताना दाखवण्यात आलं आहे. भारतात समलैंगिक संबंध वैध झाल्यानंतर हा सिनेमा वृद्ध लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी तयार आहे. वाह”, असं ट्विट पीटर यांनी केलं.

पीटर यांच्या या ट्विटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत ‘ग्रेट’ असं लिहिलं.

यानंतर पीटर यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला रिट्विट केलं. “राष्ट्राध्यक्षांकडून एलजीबीटीच्या मुद्याला गंभीरतेने घेण्याची ही सुरुवात आहे, त्यांचा कुठला पीआर स्टंट नाही, अशी मी आशा करतो”, असं ट्विट पीटर यांनी केलं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button