breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाजपच्या खोट्या प्रचाराला काँग्रेसचे ‘प्रोजेक्ट शक्ती अॅप’ प्रत्युत्तर देणार – सचिन साठे

पिंपरी –  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती अॅप’ च्या माध्यमातून काँग्रेसचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपच्या खोट्या प्रचाराला काँग्रेसचे ‘प्रोजेक्ट शक्ती अॅप’ प्रत्युत्तर देईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि. 14 ) चिंचवड संभाजीनगर येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाचे सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, कार्यक्रमाचे संयोजक व भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, बिंदू तिवारी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितिज गायकवाड, हिरामण खवळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, उमेश खंदारे, वसिम इनामदार, बांधकाम सेलचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे आदींसह कॉंग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साठे म्हणाले, “या अॅपव्दारे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संपर्क साधता येईल. काँग्रेसची ध्येय धोरणे, चालू घडामोडींवरील पक्षाची अधिकृत भूमिका यातून सोप्या पध्दतीने नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी प्रोजेक्ट शक्ती अॅपशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या मोबाईलवरुन 8828843010 या क्रमांकावर आपला मतदार ओळखपत्र क्रमांक मेसेज करावा. यानंतर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी आपल्याला कनेक्ट होता येईल. याचा जास्तीत-जास्त नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button