breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांना ‘वाण म्हणून साड्या’चे वाटप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कष्टकरी महिलांना वाण म्हणून साड्याचे वाटप करण्यात आले. यामुळे कष्टकरी महिलांची संक्रांत ‘गोड’ झाली आहे. 
भोसरी येथील भैरवनाथ मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी नाका (भोसरी) रहाटणी नाका (पिंपरी) आणि डांगे चौक नाका (चिंचवड) येथील कष्टकरी महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून साडी वाटप करण्यात आले. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, जिल्हा शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, शहर प्रमुख योगेश बाबर, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, अभिमन्यु लांडगे, युवासेना अधिकारी सचिन सानप, शहर संघटिका आशा भालेकर, परशुराम अल्हाट, सिमा जगदाळे, संघटनेचे सचिव पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, बांधकाम विभागाच्या उज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, संघटनेचे संघटक वामन दांडे, नीलेश साळुंके, दादासाहेब देडे, अंबादास उदार, मारुती जाधव, राजू जाधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारणाचा मंत्र दिला आहे. हा मंत्र घेवून शिवसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. शहरात लाखोंच्या संख्येने कष्टकरी महिला आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी कष्टकरी महिला अद्यापही सामाजिक प्रवाहात आल्या नाहीत. त्यांच्या कष्ट, उपेक्षा कायम आहे. अशा महिलांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या कष्टकरी महिला आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. कष्टकऱ्यांवरील ही ‘संक्रांत’ दूर करण्यासाठी पुढील काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही इरफान सय्यद यांनी नमूद केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button