breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पिंपळे सौदागर येथील जगताप कुटूंबियांचे सांत्वन

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्या विराज जगताप याच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

प्रेम प्रकरणातून खुनी हल्लात विराज जगताप यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ माजली होती या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगताप कुटूंबियांची भेट घेतली व महाराष्ट्र शासनाच्यावतीने ४,२५,०००/- चा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.

या प्रसंगी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, पोलिस आयुक्त संतोष बिश्नोई  उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी विराज जगताप याची आजी सुभद्रा जगताप यांची भेट घेऊन शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल तसेच या केससाठी तुम्ही म्हणाल तो वकील शासनांच्यावतीने देण्यात येईल याची ग्वाही दिली. पोलिस आयुक्तांकडून या केसबाबत माहिती घेऊन दौषींवर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत आश्वासन दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button