breaking-newsमनोरंजन

पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या ‘चौकीदार’ सवींच्या मदतीला धावून आला राजकुमार

बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचं स्वप्न पाहून मुंबईत आलेले सवी सिद्धू हे सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी सुरक्षारक्षकाची नोकरी करत आहेत. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘पटियाला हाऊस’, ‘गुलाल’, ‘पाँच’ या चित्रपटांमध्ये काही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये ते झळकले होते. मात्र आता त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून अभिनेता राजकुमार राव सवी यांच्या मदतीला धावून आला आहे.

‘तुमचा लढा हा नक्कीच प्रेरणादायी आहे. अनेक चित्रपटातील तुमच्या भूमिका या कौतुकास्पदच आहेत. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टीकोन मला आवडला. कास्टिंग क्षेत्रात काम करणारे माझे काही मित्र तुम्हाला नक्की मदत करतील. मी तशी विनंती त्यांना केली आहे’, असं राजकुमार म्हणला. सवी यांना पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम देण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी राजकुमारनं दर्शवली आहे. तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.  ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘पटीयाला हाऊस’ सारख्या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत सवी झळकले होते. मात्र तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मायनगरीला रामराम ठोकून सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करली.

Rajkummar Rao

@RajkummarRao

Very inspired by ur story sir. Have always admired ur work in all ur films. Love ur positivity. Will def ask all my casting friends to reach out to u. Thank u @FilmCompanion for sharing his story. Perseverance is the key to overcoming obstacles.

Film Companion Hindi@FC_Hindi

ब्लैक फ़्राइडे, गुलाल, और पटियाला हाउस जैसी फ़िल्मों में अभिनय करने वाले ‘सवी सिद्धू’, क्यूँ अब मलाड में सिक्युरटी गार्ड की नौकरी कर रहे हैं? जानिए फ़िल्मी कनेक्शन के इस एपिसोड में उनकी कहानी उनकी ज़ुबानी। https://www.youtube.com/watch?v=g3yWy9C4QRE&t=2s #Chowkidar #Mumbai #Bollywood

View image on Twitter
१२० लोक याविषयी बोलत आहेत

‘या क्षेत्रात माझ्यासाठी कामाची कमी नव्हतीच. इथे लोकांना काम मिळत नाही पण, माझ्याकडे इतकं काम होतं, की कालांतरानं मला ते नाकारावं लागलं. माझी प्रकृती खालावत होती. प्रकृती बिघडल्यानंतर कामही बंद झालं. काम नसल्यानं आर्थिक परिस्थितीही हळूहळू बिघडत गेली. दिवस सरत गेले तसंतसं काम संपत गेलं. पोटाची खळगी भरण्यासाठी अखेर मला नोकरी सोडावी लागली’ असं ते एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओनंतर त्यांची मदत करण्यासाठी अनेकजण पुढे आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button