breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पैशासाठी मुलीच्या अपहरणाची धमकी देणा-या खंडणीखोरांना ठोकल्या बेड्या

  • वाकड पोलिसांची कामगिरी
  • पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती

पिंपरी – फेसबुकवरील कुटुंबाची माहिती घेऊन वाकड येथील एका बड्या व्यवसायिकाच्या पत्नीला मोबाईलवर संपर्क साधून मुलीला पळवून नेण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी उकळणा-या दोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काळेवाडी परिसरात वाकड पोलिसांनी वेषांतर करून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शनिवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत दिली.

रोहित विनोद यादव (वय 28, रा. प्रेमनगर, नझमगड नवी दिल्ली)आणि अभिनव सतिश मिश्रा (वय 27, रा. लखनौ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांचेही बी. टेक झाले आहे. त्यांचे शिक्षण पुण्यात पूर्ण झाले आहे.

 

 

वाकड परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये एका व्यवसायिकाचे कुटुंब राहते. आरोपी रोहितला व्यवसायिकाच्या कुटुंबाची माहिती होती. या व्यवसायिकाच्या पत्नीच्या फेसबुक खात्यावरुन  आरोपींनी मोबाईल क्रमांक मिळवला. बुधवार (दि. 19) दुपारी चारपासून आरोपींनी व्यवसायिकाच्या पत्नीला सार्वजनिक दुरध्वनीवरुन फोन करण्यास, मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली. पाच लाखाच्या खंडणीची मागणी करत खंडनी न दिल्यास 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी तपास सुरु केला.

 

आरोपी कानपूर, दिल्लीतून फोन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी महिलेला आज शनिवारी (दि. 22) लोहगाव विमानतळावर पैसे घेऊन येण्यास सांगितले. तथापि, विमानतळावर गर्दी असल्याने आरोपींना अधिक पैशांचे आमिष दाखवत वाकड परिसरात बोलविले. डी. पी. बॉक्सच्या पाठीमागे खंडणीची रक्कम ठेवण्यास आरोपींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. वेषांतर करत पोलीस तैनात होते. आरोपी पैसे ठेवलेल्या परिसरात आले. परंतु, त्यानी पैसे उचलले नाहीत. ते संशयितरित्या घुटमळत असल्याने पोलिसांनी आरोपी रोहित आणि अभिनव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पद्मनाभन यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button