ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा; द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

सांगली | सांगली शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह प्रचंड गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे द्राक्ष बागांमध्ये गारांचा खच पडल्याचे दृश्य पाहायला मिळत होते. या गारपिटीचा द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली-मिरज शहर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून उन्हाचा कडाका वाढली होता. तापमान ४२ अंशांपर्यंत पोहचले होते. त्यामुळे सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते. गुरुवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगलीकरांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. सुमारे अर्ध्यातासाहून अधिक वेळ मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळपर्यंत सांगली-मिरज शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे पावसाळासदृश्य वातावरण निर्माण झाले होते. तर वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

तर, दुसऱ्या बाजूला जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे. वादळी वाऱ्यासह तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तर नागठाणे संतगाव, अंकलखोप परिसरात प्रचंड गारपीट झाली आहे. गारांचा मारा झाल्यामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे द्राक्ष बागांमध्ये गारांचा खच पडलेला पाहायला मिळाला. यामुळे द्राक्ष पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button