breaking-newsपुणे

पुणे : राम मंदिरात नीलम गोऱ्हेंकडून आरती, श्रीराम नावाच्या पेढ्यांचा दाखवला प्रसाद

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी पहिल्यांदा मंदिर त्यानंतर सरकार अशी घोषणा देऊन आयोध्यला जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच अयोध्यकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी आपापल्या ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये आरती केली. पुण्यातल्या तुळशीबागेतील राम मंदिरात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी आरती केली आणि श्रीराम नावाच्या पेढ्यांचा प्रसाद दाखवला. यावेळी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोणत्याही आश्वासनची पूर्तता करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राम मंदिराचा निर्णय देखील त्यांनी अद्याप पर्यंत घेतलेला नाही. याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येतील जनतेला ते संबोधित करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button