breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राजभवनात २२ टनी जुळ्या तोफा

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या असून शनिवारी दोन्ही तोफा क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशके मातीखाली दबून होत्या.

नौदलाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन या तोफांची तांत्रिक माहिती घेतली जाणार आहे. या तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनाच्या अधिकाऱ्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी केली आहे.

या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वेट हॉल) सभागृहाच्या  समोर दर्शनी भागात ठेवण्यात येणार असून त्या नागरिकांना पाहता येतील.

राजभवन येथे काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या दोन वजनदार तोफा दिसल्या. अनेक वर्षे या तोफा पडून राहिल्या असल्याने त्या बव्हंशी झाकल्या गेल्या होत्या. या तोफांची  लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी सायंकाळी तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे जतन करण्याची सूचना केली आहे. २०१६ साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिरक्षणाचे काम एका वास्तूविशारद संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे काम झाल्यानंतर त्याठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुले करण्याची सूचना राज्यपालांकडून यापूर्वीच देण्यात आली आहे, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button