breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वारक-यांचा ‘मृदंग’ देऊन होणार सत्कार  

पिंपरी, (महाईन्यूज) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या उद्योगनगरीत थाटात आगमण होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना मृदंग देऊन सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सांप्रदायीक परंपरा जपण्यासाठी तत्काली पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू दिली जात होती. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी दिंडीक-यांना विठ्ठल-रुक्मिनी मुर्ती, ताडपत्री, सतरंज्या आदी साहित्य भेटवस्तू देण्यात आल्या. मात्र, 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांना भेट वस्तू देण्याच्या मुद्यावरून दरवर्षी वाद चिघळला जातो. यावर्षी भेट वस्तू देण्यात येणार नाहीत, असे भाजप पदाधिका-यांनी सुरूवातीला जाहीर केले. मात्र, ऐनवेळी पालिकेने मृदंग भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोहळ्यातील प्रत्येक दिंडीप्रमुखांना एक मृदंग भेट दिला जाणार आहे. त्यासाठी 743 मृदंग खरेदी करण्यात आले आहेत. नगरमधील पाथर्डी येथून 150, आळंदी येथून 150 आणि पंढरपूर येथून 443 असे एकूण 743 मृदंग खरेदी केले आहेत. एक मृदंग 3 हजार 300 रुपयाला खरेदी केला आहे. हा खर्च नगरसेवकांच्या मांधनातून करण्यात आला असल्याची माहिती महापौर जाधव यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button