breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पिंपरी-चिंचवडचे अवैध धंदे बंद करा’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

 – सामाजिक कार्यकर्त्यां संगिता शहा यांची तक्रार
– मुख्यमंत्र्यासह पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
– चिखलीसह शहरातील अवैध धंदे करणा-याकडून तक्रारदाराला धमकी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांच्या आर्शिवादाने अवैध धंद्यात वाढ झाली आहे. शहरात मटका, जुगार, सोरट लाॅंटरी, दारु, हातभट्टी यासह दिवसा खुन, मारामा-यांचे प्रकार वाढले आहेत. अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस यंत्रणा कुचकामी ठरु लागल्याने याबाबत थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करीत शहरातील अवैध धंदे बंद करावेत, संबंधित पोलिस अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्या संगिता शहा यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे कमी व्हावेत, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पिंपरी चिंचवड शहरात नव्याने पोलीस आयुक्तालय स्थापन झाले आहे. परंतू,  पिंपरी चिंचवड आयुक्तालयातंर्गत असणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकी हद्दीत अवैध धंदे प्रचंड वाढले आहेत. हे प्रकार थांबविण्यास  पोलीस प्रशासन कुचकामी ठरत आहे.
चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत भिमनगर परिसरात जागा भाडेतत्वार घेऊन जुगार, मटका, सोरट पत्ते कल्ब, अवैध धंदा व विषारी घातक हातभट्टी दारु विक्री सुरु आहे.  चिखली  पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ते विविध पोलीस कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंधामुळे अवैध धंद्यास पाठबळ मिळाले आहे.  सदर अवैध धंदा कायमस्वरुपी बंद करावा, याकरिता ०१ फेब्रुवारी २०१९ ते दि ०४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चिखली पोलीस स्टेशनशी वारंवार संपर्क करुन तोंडी तक्रार करुन सांगण्यात आले. परंतु काहीही फरक न पडल्याने दि ५ फेब्रुवारी २०१९ रोजी विविध संघटनाच्या वतीने लेखी तक्रार अनिता रविंद्र सावळे यांनी दिली. अवैध धंदे बंद करण्याऐवजी त्यांनी पोलिसांनी नोटीस दिली. स्थानिक पोलिस अधिका-यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे अवैध धंद्याना प्रोत्साहन देणा-या चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे ) एस. व्हि. अवताडे यांची तात्काळ आंतरजिल्हा  बदली करण्यात यावी, अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्या पाच महिन्यांचे वेतन कपात करावे, दोषींवर फौजदारी तत्सम निलंबनाची कठोर कारवाई करावी,  तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावाल्यांना मोक्का तडीपारी सारख्या गंभीर गुन्ह्यांसारखी कठोर कायदेशीर कारवाई,  कायमस्वरुपी अवैध धंदे बंद करण्यास प्रभावी अमंलबजावणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
तसेच  अवैध धंद्यांमुळे जनतेचे शोषण होवून त्यांच्या दारिद्रयात वाढ होत  आहे. नागरिकांसह युवकांना व्यसनाधिन बनू लागला आहे. अवैध धंदे बंद करण्यास पोलीस प्रशासन राजी नसल्याने या धंद्याना खतपाणी मिळत आहे. सदर सर्व प्रकारच्या अवैध धंद्याच्या व  पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराने हप्ते वसूली वाढली आहे. अवैध धंद्यांना समर्थन प्रोत्साहन देण्याच्या मुजोर वृत्ती विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष संघटना,  मंडळे, प्रतिष्ठान, महिला संघटना, विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्तपणे दि 12 फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button