breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहिला दिनराजकारण

नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर, कणकवलीत मात्र प्रवेश बंदी

 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून न्यायालयीन कोठडीत आसलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नितेश राणे यांच्या सह त्यांचा स्वीय सहायक राकेश परब यालाही जमीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांना आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

४ फेब्रुवारी रोजी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी ओरस येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र नितेश राणे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान लतादीदींच्या निधनामुळे सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर मंगळवारी सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे आणि संग्राम देसाई यांनी न्यायालयास सांगितले कि, नितेश राणे यांची पोलिसांनी ४८ तास चौकशी केली असून, त्यांनी पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य केलेले असल्याने त्यांचा जमीन मंजूर करावा. मात्र सरकारी वकील प्रमोद घरत यांनी नितेश राणे यांच्या जामिनाला विरोध करताना, त्यांना जर जमीन दिला तर बाहेर जाऊन ते साक्षी पुराव्याशी छेडछाड करतील आणि त्याचा तपासावर परिणाम होईल असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब यांचा ३० हजाराच्या जात मुचाल्क्यावर जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना कणकवली तालुक्यात प्रवेशबंदी असेल. तसेच आठवड्यातून एकदा त्यांना ओरस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे आणि पोलीस तपासासाठी ज्या ज्या वेळी बोलावतील त्यात्या वेळेला त्यांना पोलिसांच्या समोर हजर राहावे लागणार आहे.

नितेश राणे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. तर सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नाही असे नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी सांगितले .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button