breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना नदीसुधार प्रकल्पासाठी ‘एसव्हीपी’ स्थापन करा – नगरसेवक संदीप वाघेरे

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदीला प्रदुषण मुक्त करण्यासाठी ‘पवना नदीसुधार प्रकल्पास’ एसव्हीपी स्वतंत्र कंपनी स्थापन करावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली. 
यासंर्दभात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, शहरातील पवना नदीचा रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, सांगवी, दापोडी असा चोविस कि.मी. व मुळा नदीचा साडे बारा कि.मी.चा प्रवाह आहे. नदी किनारी असणा-या लोकवस्ती व कंपन्यांमुळे अनेक ठिकाणी प्रदुषित पाणी नदीत सोडले जाते. शंभर टक्के पाणी पुर्नप्रक्रिया करुन सोडण्याची यंत्रणा महापालिका अद्यापही उभारु शकलेली नाही.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास होत असताना पवना नदी सुधार करणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, प्रशासन वेळोवेळी निधी उपलब्ध नसल्याचे सांगून अशा प्रकल्पाकडे दुर्लक्ष करते. याबाबत निधी उभारणीसाठी नदी काठच्या भागामध्ये टी.पी प्लॅन योजना राबवावी. त्यातून वेळप्रसंगी नदी लगत असणाऱ्या हरित पट्यांमध्ये बदल करून भूखंडावर ज्यादाचा अधिकार (प्रिमियम चार्जेस) आकारून निधी उभारता येईल. पुणे महानगरपालिकेने काही प्रकल्पांसाठी खुल्या बाजारात बॉन्ड (रोखे) विक्री करून निधी उभारला आहे,  त्याप्रमाणे खुल्या बाजारात रोखे विक्री करुन, किंवा पवना नदी सुधार योजना राबविण्यासाठी सोशल इन्वायरमेंट रिस्पॉन्सिबिलीटी (सीईआर) किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉस्न्सिबिलीटी (सीएसआर) फंड पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमविणा-या कंपन्यांकडून निधी मिळविता येईल.
शहरात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गतही पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आपण राबवु शकतो. यामुळे हरीत पट्ट्यातील जमिनीचा विकास करता येईल. त्यातून महापालिकेसही कायम स्वरुपी मोठे आर्थिक उत्पन्न मिळेल. या उत्पन्नातून आणखी विकास प्रकल्प राबवुन पिंपरी चिंचवड शहर खरोखरच स्मार्ट करता येईल. शहरातील पवना नदीसाठी कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत पवना नदी सुधार प्रकल्पाचा डीपीआर (DPR) लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. असे केल्यास मेट्रो व स्मार्ट सिटी प्रकल्पाप्रमाणे पवना सुधारचे काम अधिक गतीने होईल. अशीहि मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button