breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नोव्हेंबरअखेर आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करणार : मुख्यमंत्री

  • आंदोलन थांबवून चर्चा करण्याचे आवाहन 
मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर असून उशिरात उशिरा नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाची घटनात्मक प्रक्रिया पुर्ण केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी धनगर आणि मुस्लीम आरक्षणबाबतही ग्वाही दिली.महाराष्टृात शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले
मराठा आरक्षणाच्या मागणीसह राज्यातल्या सद्यस्थितीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविावारी जाणीवपूर्वक राज्याच्या जनतेशी संवाद साधला.मराठा आरक्षणासह, धनगर, मुस्लिम समाजानं देखील आरक्षणाची मागणी तीव्र केलीय. या मागण्यांवरही मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले होते.मराठा आरक्षण लागू करण्याबाबतच्या आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेची यावेळी त्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले,इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मरलाठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात येणार आहे.आरक्षणाचा निर्णय अंमलात येईपर्यंत राज्यातील मेगाभरती स्थगित करण्यात येणार आहे.त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर कोणताही अन्याय होणार नाही.
सरकारसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका घेऊ नका, कोणत्याही विषयावर चर्चेनं तोडगा निघत असतो , त्यामुळे चर्चा करा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,काही लोकं हे मराठा आंदोलन पेटतं ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहे, तुमचा जीव लाख मोलाचा आहे, कृपया आत्महत्या करू नका.दंगलीमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.ऐतिहासिक औरंगाबादेत कचरा प्रश्नावरून हिंसाचार पेटतोय, क्षुलक कारणावरून दंगल घडतेय हे महाराष्ट्रासाठी शोभनिय नाही.
पुण्यातील चाकण हा औद्योगिकदृष्या विकसित आहे, जर अशा ठिकाणी हिंसाचार घटत असेल तर तिथे उद्योजक येणार का असा सवाव करुन मुख्यमंत्री म्हणाले,महाराष्ट्रात 8 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
मराठा समाजासाठी विविध निर्णय या सरकारनं घेतले की जे अजून कधीही घेतले गेले नाहीत.वैधानिक कारवाई पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.सर्वोच्च न्यायालयात न टिकणारा अहवाल हा केवळ दोन दिवसांचा आनंद देणारा असेल.राज्य मागस आयोगाचा अहवाल लवकर आला तर लगेच विशेष अधिवेशन बोलावले जाईल.राज्य मागास आयोग 7 ऑगस्टला मराठा आरक्षणाबाबत अहवाल देण्याबाबत माहिती देणार आहे असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button