breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

निगडीतील यशवंतराव चव्हाण स्मारकांस पावणे दोन कोटी निधीची तरतूद

  • यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस 5 कोटी निधी देण्यास राज्य शासनाची मान्यता

पिंपरी ( महा ई न्यूज ) – निगडीतील यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 5 कोटी निधी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आज (बुधवार) झालेल्या स्थायी समिती बैठकीत 1 कोटी 89 लाख रुपये तरतुद वर्गीकरणास मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडेगिरी होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात निगडी येथे यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकात गोरगरीब, अनाथ व अपंगासाठी अभ्यासिका, वसतिगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र इ बांधण्याचे नियोजन आहे.

महापालिकेमार्फत यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस पाच कोटी देणगी स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतू, शहरातील काही स्वयंसेवी संस्थानी स्मारक समितीला 5 कोटी देण्यास विरोध दर्शविला होता. त्यावरुन महापालिकेने हा ठराव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यावर स्व.यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यास स्मारक समितीस 5 कोटी रुपयांपर्यंत देणगी स्वरुपात अदा करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.

त्यानूसार महापालिकेच्या स्थायी समितीत 5 कोटीपैकी 1 कोटी 89 लाख रुपये देणगी यंदाच्या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button