breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

मकर संक्रांतीला यंदा चुकूनही घालू नका काळ्या रंगाचे कपडे; नेमकं कारण काय?

Makar Sankranti 2024 | पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं. तर मकर संक्रांती हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो.

अशा वेळी जास्त उष्णता शोषून घेणारे काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान केले जातात. हे यामागचं वैज्ञानिक कारण आहे. कारण काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त ऊब असते. त्यामुळे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मात्र यंदाच्या वर्षी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत.

कारण यंदा देवी संक्रांतीचे मुख्य वाहन घोडा असून त्यासोबतच उपवाहन सिंह आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. तसेच, तिची दक्षिण-पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे. तिने हातामध्ये भाला घेतला असून तिच्या कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे. ती वृद्धावस्थेत येत आहे.

हेही वाचा    –    शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल 

तसेच यावर्षी देवी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीला काळा रंग परिधान करणं वर्ज्य मानलं जाईल. खरंतर, दरवर्षी संक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो. मात्र यंदा हा रंग वर्ज्य आहे.

कोणत्या रंगाचे कपडे घालावे :

  • मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे.
  • हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
  • हिरवा रंग आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करतो. तर लाल रंग उत्साह, पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो.
  • त्यामुळे या रंगांचे वस्त्र तुम्ही नक्कीच घालू शकता.
  • शिवाय याव्यतिरिक्त तुम्ही नारंगी, पिवळा, जांभळा किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र देखील घालू शकता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button