breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का, नेत्या भारती पवार भाजपात जाणार

नाशिक – सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासह आता उत्तर महाराष्ट्रातील पवार घराण्याच्या सुनबाई म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भारती पवार या भाजपात प्रवेश करणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघावर भारती पवार यांनी दावा ठोकला आहे. परंतु, त्यांची उमेदवारी कापण्यात येणार असल्याचे समजताच त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजते.

भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, असे समजते. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झाल्याने भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती पवार या शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपामध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक आहेत, असे समजते.

भारती पवार या २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या धनराज महालेंना उमेदवारी दिली. त्यामुळे आता भाजपाकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने भारती पवार या भाजपात जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button