breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! इन्शूरन्सच्या लाखो रुपयांसाठी त्याने ‘असा रचला’ स्वत:च्या मृत्यूचा बनाव

इन्शूरन्स क्लेमचे पैसे मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेशच्या सिरमोर पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपी आकाशला मंगळवारी पालवाल रेल्वे स्टेशनवरुन अटक केली. आकाश मूळचा चंदीगडचा आहे. इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्याने हा कट रचला होता.

आपला अपघाती मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी आकाशने एका मजुराची हत्या करुन त्याचा मृतदेह गाडीमध्ये जाळला. आकाशची मोठया रक्कमेची इन्शूरन्स पॉलिसी होती. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तो सर्व पैसा हवा होता यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. पैशाच्या या मोहापायी एक निरपराध मजुराला आपले प्राण गमवावे लागले.

आकाशचा भाचा रवी कुमारही (२९) या कटामध्ये सहभागी होता. त्याने सुद्धा गुन्ह्यामध्ये साथ दिली. रवी कुमारला सोमवारी हिमाचल प्रदेशमधील नाहान येथून अटक करण्यात आली. २० नोव्हेंबरला नाहान पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. जुद्दा का जोहर येथे भरधाव कार भिंतीला धडकल्यानंतर पेट घेतला. पोलीस येण्यापूर्वीच ही कार आगीत जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत गाडी चालवणाऱ्या आकाश नावाच्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला अशी नोंद करण्यात आली होती.

अपघाताच्या दुसऱ्या दिवशीच आकाशचे कुटुंब मृत्यूचा दाखला देण्यासाठी पोलिसांच्या मागे लागले. त्यावेळी पोलिसांच्या मनात पहिल्यांदा संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांची एक टीम राजस्थानमधून बेपत्ता असलेल्या मजुराच्या शोधात नाहान येथे आल्याचे पोलिसांना समजले. हा मजूर आकाशसोबत काम करत होता. त्याचे शेवटचे बोलणे देखील आकाशसोबत झाले होते. त्यामुळे या प्रकरणात कुटुंबाची घाई बघून हिमाचल प्रदेश पोलिसांचा संशय अधिक बळावला.

या दरम्यान रवी ३ डिसेंबरला नाहान येथे आला होता. पोलिसांनी संशयाच्या आधारावर रवीला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आकाशने गाडी पेटवली त्यावेळी रवी त्याच्यासोबूत असल्याचे पोलिसांना चौकशीत समजले. त्यावेळी गाडीमध्ये त्या मजुराचा मृतदेह होता. ठरल्याप्रमाणे कटाची अंमलबजावणी केल्यानंतर दोघे हरयाणाला निघून गेले.

आकाश नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. ठरलेल्या कटानुसार आकाशने १९ नोव्हेंबरच्या रात्री जाणीवपूर्वक गाडी भिंतीला धडकवली. त्यानंतर पोलीस येण्यापूर्वीच गाडीला आग लावली. या सर्व कटाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी चार डिसेंबरला आकाशला पालवाल रेल्वे स्टेशनवरुन अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button