breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंब्य्रातील प्राईम हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग; 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कुरूना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात अनेक अपघात घडत आहेत. त्यातच काल मध्यरात्री परभणी येथे ऑक्सिजन पाइपलाईनवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती झाली होती. त्यानंतर आता मुंब्य्रातील प्राईम हॉस्पिटलला मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंब्राचे स्थानिक आमदार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या घटनेची माहिती देत 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं व्यक्त केलं आहे. तसेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंब्य्राच्या प्राईम रुग्णालयात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, त्यातील 3 जणांचा या भीषण आगीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तात्काळ याठिकाणी पोहोचून मदत कार्य सुरू केलं. दरम्यान, या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

मुंब्य्राच्या प्राईम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देणार असून जखमी झालेल्यांना 1 लाख रुपये देणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच राज्य शासन रुग्णालयांचं फायर ऑडिट का करत नाही? असा प्रश्नही या माध्यमातून विचारला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button