breaking-newsपिंपरी / चिंचवड

दुबार मतदारांना हरकतींसाठी दोन दिवसांची मुदत

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मयत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत हरकती घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतरदारसंघातील मतदारांना येत्या गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाचपर्यंत हरकती, सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

चिंचवड मतदारसंघाच्या मतदार यादीत एकूण ९७७ मयत, ७६७ दुबार आणि ६११ स्थलांतरित अशा एकूण २ हजार ३५५ मतदारांचा अहवाल मिळाला आहे. संबंधितांना नोटीस बजावून व समक्ष पाहणी करून अहवाल प्राप्त झाले आहेत. या मतदारांच्या याद्या राज्याचा मुख्य निवडणूक आयोग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्या ३० ऑगस्टअखेर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या प्रस्तावित यादीवर मतदारास हरकती व सूचना नोंदवायच्या असल्यास ३० ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपर्यंत मुदत आहे. चिंचवड मतदार संघातील मतदारांनी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हरकती, सूचना मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button