breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्याला पुण्यात अटक

  • नऱ्हे येथे कारवाई : “टेरर फंडिंग’प्रकरणी मुख्य सूत्रधार जाळ्यात
    उत्तर प्रदेश व पुणे एटीएसची संयुक्‍त छापेमारी
    उत्तर प्रदेशातून तीन महिन्यांपासून होता फरार

पुणे – काश्‍मीरमध्ये दगडफेक तसेच ईशान्यकडील राज्ये व कर्नाटकसह अनेक राज्यांत अतिरेक्‍यांना पैसे पुरविण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचा ठपका ठेवत रमेश शहा याला उत्तरप्रदेश आणि पुणे दहशतवादविरोधी पथकाने पुण्यात मंगळवारी अटक केली. त्याला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करुन त्याचा तीन दिवसांचा “ट्रान्झिटर कोठडी’ घेण्यात आली आहे. गोरखपूरमधून मागील तीन महिन्यांपासून तो फरार होता. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

रमेश शहा पुण्यातील नऱ्हे येथील एका खोलीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे एटीएसशी संपर्क साधत मंगळवारी सकाळी नऱ्हे येथे त्याच्या खोलीवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले गेले. गोरखपूर येथून तो फरार झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होता. सुमारे 15 दिवसांपूर्वी तो पुण्यात आला होता. एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने त्याने नऱ्हे येथे एक खोली घेतली होती. पाकिस्तानचे हॅंडलर आणि अतिरेक्‍याचे ऑपरेटर यांच्यात सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची देवाणघेवाण करण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. ही रक्कम मध्यपूर्वेतून येत असे तसेच तिचे वितरण काश्‍मीर, ईशान्य राज्ये तसेच इतर वेगवेगळ्या राज्यात केले जात होते. पाकिस्तानी हॅंडलरने दिलेल्या सूचनेनुसार इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यामधून ही रक्कम वितरित करण्यात आली. गोरखपूर “टेरर फंडिंग’च्या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएस पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीचा रमेश शहा हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले रमेश शहा हा बिहारमधील गोपळगंज येथील राहणारा असून गोरखपूर येथे एक शॉपिग मार्केट चालवित आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून गेल्या 3 महिन्यांपासून तो फरार होता. उत्तर प्रदेश एटीएसची पथके त्याचा अनेक राज्यात शोध घेत होती. तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यावर उत्तर प्रदेश एटीएसने पुणे एटीएसशी संपर्क साधला त्यांच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसने रमेश शहा अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button