breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शिवने क्रूझवर साजरा केला विणाचा Birthday…

बिग बॉस मराठी पर्व 2 सुरु असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडलेले आणि महाराष्ट्राचे लाडके कपलं कपल म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असलेल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असतात. नुकताच शिवने वीणाचा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वीणाचा वाढदिवस स्पेशल व्हावा यासाठी शिव तिला घेऊन क्रूझवर गेला होता. तेथे त्याने वीणासाठी खास केक मागवला होता. त्या केकवर ‘Happy Birthday Rani’ असे लिहिले होते. शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वीणाचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो वीणासोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्याने “Happy birthday sweet heart.. Bekhayali Mein Bhi Tera hi khayal Aaye” असे कॅप्शन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button