breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दोन दिवसीय गोवा दौरा

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गोव्यात नागरी स्वागत व सत्कार सोहळय़ाचे आयोजन राज्य सरकारने केले असून त्यासाठी खास समन्वय समिती स्थापन केली आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक टी. एस. सावंत हे त्या समितीचे अध्यक्ष असून विविध खात्याच्या संचालकांना समितीत समाविष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रपती झाल्यानंतर गोविंद हे प्रथमच गोवा भेटीवर 7 व 8 जुलै रोजी येणार असून त्यांच्या या भेटीचे निमित्त साधून गोमंतकीय जनतेतर्फे त्यांचा भव्य स्वागत सोहळा तसेच सत्कार करण्याचे योजण्यात आले आहे. हा सोहळा 7 जुलै किंवा 8 जुलै यापैकी एका दिवशी करण्याचा इरादा आहे. 7 जुलै रोजी गोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा होणार असून तेथे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. त्यामुळे नागरी स्वागत, सत्कार सोहळा प्रामुख्याने 8 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. समन्वय समितीमध्ये विविध खात्याच्या संचालकांचा समावेश आहे.

नगरविकास खाते-संचालक, उच्च शिक्षण संचालक, पंचायत संचालक, कला-संस्कृती खाते संचालक, उद्योग, कॉमर्स खाते संचालक, पोलीस अधीक्षक (सुरक्षा) प्रधान मुख्य अभियंता (सार्वजनिक बांधकाम खाते) यांना समितीवर स्थान देण्यात आले आहे. सोहळा आयोजनाची जबाबदारी समितीकडे सोपवण्यात आली असून तिने आपले काम सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button