breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘त्या’ पत्रातील मजकूरांने खासदार बारणेंची उडाली झोप

  • शिवसेना-भाजप मनोमिलन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बारणेंच्या विरोधात पत्रके

पुणे –  भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दुभंगलेली मन वळविण्यासाठी आकुर्डीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आज (मंगळवारी) घेण्यात आला. या मेळाव्यात मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबत एक मजकूर लिहिलेले पत्रक त्या कार्यक्रमात वाटण्यात आले. हे पत्रक बारणे समर्थकांच्या लक्षात येताच लगेच सर्व पत्रके गोळा करुन फाडून टाकण्यात आले. मात्र, त्या पत्रकांने खासदार बारणेंची निश्चित झोप उडविली आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मावळात प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप-शिवसेना युती झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी दुभंगलेली मन वळवण्यासाठी समन्वयास आकुर्डीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. या मेळाव्यास भाजप आणि शिवसेनेचेही नेते उपस्थित होते.

या कार्यकर्ता मेळाव्याला आमदार लक्ष्मण जगताप यानी दांडी मारली. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या. तसेच याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी खोडसाळपणा करत काही पत्रे वाटण्यात आली. ज्यामुळे शिवसेना-भाजपात अजूनही समन्वय झाले नसल्याचे दिसून आले. मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात चांगलेच शितयुध्द पेटले आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील वादामध्ये कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.

काय म्हटलं आहे त्या पत्रात?

श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण… 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार बारणे यांचा मागच्या वेळेस बेडकाचा बैल दाखवून भोकाडी दाखवण्याचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला खरा… पण त्यानंतर 5 वर्षे या गड्याने संसदरत्न नावाखाली झोपूनच काढली. प्रत्यक्ष मतदार संघातील यक्ष प्रश्नाबाबत कुठलेच ठोस निर्णय महाशयांना घेता आले नाही. कायम स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या बारणेंनी ज्या कलाटेनी त्यांच्या उमेदवारी आणि विजयासाठी जीवाचे रान केले, त्याचाच पहिला तळीभंडार करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चक्क त्यांच्याविरोधात उघड प्रचार केला. मनपाच्या निवडणुकीत स्वतः त्यांच्या वॉर्डात राष्ट्रवादीशी भ्रष्ट युती केली. त्यामुळे स्वतःच्या गावातला पॅनल ही ते निवडून आणू शकले नाहीत. पडे तो भी टांग उपर या म्हणी प्रमाणे होवू घातलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नटरंगाणे उद्धव ठाकरेंचा कोणताही अधिकृत निरोप नसताना, पक्षाच्या सर्व्हेत पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट असताना…. त्याची कारणे ही तशीच आहेत. कारण खासदार झाल्यावर शिवसैनिकांची कमी आणि राष्ट्रवादीची धुणीभांडी धुण्यात या महाशयांनी पाच वर्षे घालवली. असं असताना कायम शिवबंधन असलेला सच्चा शिवसैनिक असल्याचा कायम खोटा आव आणला. याच बोगस वागण्यातून काल सोनई मंगल कार्यलयात स्वतःला अधिकृत स्वयंघोषित खासदारकीचा उमेदवार म्हणणाऱ्या बारणेच्या सभेला फक्त 250 कार्यकर्ते उपस्थित होते. पाच वर्षे स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत चाललेली मॅचफिक्सिंग मात्र जनतेच्या लक्षात आली आहे. कारण लोकसभेत पराभूत होऊन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा लढण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींकडून घेऊन बसला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी पोट तिडकीने विनंती आहे की वाघाचे कातडे घालून कुणी वाघ होत नाही. मोदी साहेबांना पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी एक एक सीट महत्वाची असताना अशा खंडोजी खोपडेंना तिकीट जाऊन युतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणून हा सर्व मागोवा तुमच्या समोर ठेवत आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button