breaking-newsआंतरराष्टीय

चिनी बॉंबर विमानांच्या पाठलागावर तैवानची लढाऊ विमाने

तायपे (तैवान) – दोन बॉंबर विमाने पाठवून तैवानवर लष्करी दबाव टाकण्यासाठी चीनने प्रयत्न केला, परंतु तैवानच्या लढाऊ विमानांनी त्यांचा पाठलाग करून जोरदार प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी सकाळी चीनची दोन एचके-6 बॉंबर विमानांनी तैवानच्या सीमेजवळ्‌ चकरा मारल्या. मात्र या विमानांचा सुगावा लागताच तैवानने आपली लढाऊ विमाने त्यांना पिटाळ्ण्यासाठी पाठवली.

तैवान आणि फिलिपाईन्सच्या सीमेवरील बाशी चॅनल आणि जपानच्या मियाको सामुस्रधुनीवरून चीनच्या एचके6 विमानांनी तैवानभोवती फेऱ्या मारल्या. मात्र तैवानी लढाऊ विमानांनी त्यांचा पाठलाग केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. आमचे वायुदल चिनी विमानांवर नजर ठेवण्यास सक्षम आहे. आणि आम्ही संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहोत, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

चीन तैवानला आपलाच भाग मानत आहे. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर तैवानला एकाकी पाडण्यासाठी साम दाम दंड भेद असे सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे अलीकडेच चीनच्या दबावामुळे बर्किना फासो या आफ्रिकन देशाने तैवानबरोबरचे संबंध तोडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button