breaking-newsआंतरराष्टीय

कॅनडात भारतीय रेस्टॉरेंटमध्ये बॉंबस्फोट – 18 जण जखमी

टोरॅंटो (कॅनडा) – कॅनडामधील एका भारतीय रेस्टॉरेंटमध्ये बॉंबस्फोट झाल्याने 18 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. जखमींपैकी चार जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. टोरेंटोच्या मिसीसोंगा या उपनगरात असलेल्या बॉंबे भेळ नावाच्या रेस्टॉरेंटमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी रेस्टॉरेंट सील करून तपासणी केली. रेस्टोरेंटमधील “पेंट’च्या एका डब्यामध्ये आयईडी लपवण्यात आल्याचे आढळून आले.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

There is a blast in Indian restaurant Bombay Bhel in Mississauga, Ontario, Canada. I am in constant touch with our Consul General in Toronto and Indian High Commissioner in Canada. Our missions will work round the clock. The Emergency number is : +1-647-668-4108.
Please RT

या प्रकरणात पोलीसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. हे दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून त्यांनीच पेंट च्या डब्यात बॉंब लपवला असल्याचा पोलीसांना संशय आहे.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

Here is the latest update from Canada. The 12 persons who were taken to hospital have been discharged. The other 3 persons who were critically injured are stable. According to Police, at this stage there is no evidence to term this incident as a terrorist attack or hate crime.

स्फोट झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून त्याबद्दल माहिती दिली आहे आणि परराष्ट्र मंत्रालय कॅनडातील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button