breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केरळच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक देणार मानधन

– सुमारे वीस लाखांची मदत, अग्नीशामकच्या तीन बोट पाठविल्या  

पिंपरी – धुव्वाधार अतिवृष्टीने केरळमध्ये जनजीवन विस्कळीत होवून पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळची नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी देशभरातून मदतीचा आेघ सुरु आहे. केरळच्या नागरिकांना मदत म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेतील 133 नगरसेवकांचे एक महिन्याचे सुमारे 20 लाख रुपये आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन ती मदत दिली जाणार आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेची आज (सोमवारी) सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव हे उपस्थित होते.  महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक बाबु नायर म्हणाले की, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील नागरिकांना मदतीची गरज आहे. याकरिता नगरसेवकांचे एका महिन्याचे आणि सर्व अधिकारी, कर्मचा-याचे एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीही केरळला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत निवडून आलेले 128 नगरसेवक आहेत. तर, पाच स्वीकृत नगरसेवक असे एकूण 133 नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाला महिन्याला 15 हजार रुपये मानधन आहे. त्यामुळे  133 नगरसेवकांचे महिन्याचे 19 लाख 95 हजार रुपये मानधन होत आहे. तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button