breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

  • पिंपरी-चिंचवडसाठी संयुक्त पथकाची केली स्थापना
  • चार ठिकाणी कारवाई करून 15 वाहनांवर भरले खटले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळचा आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावण्यासाठी नवीन कल्पना आमलात आणली आहे. पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाकडून शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी धडक कार्यवाही केली जात आहे. चार दिवसांमध्ये कारवाईअंतर्गत एकूण 15 वाहनांवर खटले भरण्यात आले आहेत.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महापालिकेतील पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. खासगी बसेस, रिक्षा, परवानाधारक वाहनचालक प्रादेशिक परिवहन विभागाची शासकीय मर्यादा ओलांडून अमर्याद प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. याला आळा बसल्यास पीएमपीएमएलची प्रवासी संख्या वाढून त्याचे आर्थिक उत्पन्नात रुपांतर झाल्यास पीएमपीएमएलचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, या कल्पनेतून पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकाची स्थापना केली आहे. हे पथक शहराच्या विविध भागात कार्यरत आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आणि पीएमपीएमएलचे सहायक अधिकारी संतोष माने यांच्या नियंत्रणाखाली निगडी, पिंपरी आणि भोसरीतील वाहतूक पोलीस निरीक्षक तसेच पालिकेचे कर्मचारी पथकामध्ये सहभागी आहेत. 6 मेपासून कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. 6, 10, 13 आणि 14 मे रोजी कार्यवाही करून तब्बल 15 खासगी वाहनांवर खटले भरले आहेत. ही कारवाई पिंपरी चौक, नेहरूनगर, यमुनानगर, भोसरी स्पाईन रोड याठिकाणी करण्यात आली आहे, अशी माहिती संतोष माने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button