breaking-newsराष्ट्रिय

अमृतसर दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ?

अमृतसरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असू शकतो असा संशय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे. आयएसआयचे समर्थन असलेले खलिस्तानी किंवा काश्मिरी दहशतवादी या ग्रेनेड हल्ल्यामागे असू शकतात असा संशय अमरिंदर यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये निर्माण झालेली शांतता कुठल्याही परिस्थितीत दहशतवादी शक्तींना भंग करु देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आयएसआयचे समर्थन असलेले खलिस्तानी किंवा काश्मिरी दहशतवादी यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अमरिंदर सिंग म्हणाले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचल्या असून सर्व अंगांनी याचा तपास सुरु आहे असे त्यांनी सांगितले. घटनेच्या मुळाशी जाऊन हल्लेखोरांना शोधून काढू असे त्यांनी सांगितले.

अमृतसरच्या राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे रविवारी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर १० ते १५ जण जखमी झाले. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button