breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

परदेश दौरे करायचेच असतील तर स्वःखर्चाने करा, अन्यथा…

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – परदेश दौ-याचा एकही ठराव सर्वसाधारण सभेपुढे न आणता महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी परदेश दौ-यांवर लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. त्याद्वारे नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी होत आहे. यापुढे पदाधिका-यांनी असे दौरे स्वःखर्चाने करावेत, अन्यथा समाजवादी पक्षातर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचे देश-विदेशात दौरे वाढले आहेत. या दौ-यांचा शहराला कसलाही लाभ होत नाही. हे दौरे केवळ सहल व पर्यटणासाठी काढले जातात काय?, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. सध्या जकात व एलबीटी बंद झाल्याने पालिकेचे उत्पन्न घटले आहे. भाजपने पालिकेत काटकसर करून बचतीचे नवीन धोरण अवलंबावे. कारण, परदेश दौ-यांवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. विशेष म्हणजे दौ-यांचा ठराव सर्वसाधारण सभेपुढे देखील आणला जात नाही.

निगडी-दापोडी बीआरटी बससेवा फसलेली आहे. यासाठी लाखो रुपये खर्चून केलेला अहमदाबादचा बीआरटी दौरा निष्फळ ठरला. अनेक नगरसेवकांच्या सहली, अभ्यास दौरे घडवून आणले. त्याचा शहराला शून्य फायदा झाला. आयुक्तांनी हे दौरे रद्द करावेत. जर दौरेच करायचे असतील तर ते स्वःखर्चाने करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कुरेशी यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button