breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत नळ कनेक्शनवर तातडीने कारवाई करा ; अधिका-यांना स्थायीच्या सूचना

पिंपरी – शहरात अनधिकृत नळ कनेक्शनचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पत्राशेड, झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृत नळ केनेक्शन घेतले आहेत. याकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्थायी समिती सभेत सदस्यांनी पाणी पुरवठा विभागावर संताप व्यक्त केला. त्यावर अनधिकृत नळ कनेक्शनवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना स्थायीच्या सदस्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृत एक लाख नळजोड आहेत. तर, चार लाख मिळकती आहेत. पालिकेकडून 2012 पासून अधिकृत नळजोडून दिले जात नव्हते. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन मोठ्‌या प्रमाणात वाढले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शनच्या सर्व्हेचे काम सुरु असून 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. किती अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई केली, याबाबतचा सविस्तर अहवाल पाणीपुरवठा विभागाकडून मागविण्यात आला आहे. तसेच, पत्राशेड, झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी सांगितले.

कायद्यात बसवून दिंडीक-यांना भेट वस्तू द्या
महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून ‘तंबू’ देण्याचे विचाराधीन आहे. भेट वस्तू खरेदी करण्यासाठी पालिकेने त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना देखील स्थायी समितीने दिल्या आहेत. दरम्यान, बक्षीस देण्यात येऊ नये असा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितले. परंतु, दिंडीप्रमुखांना भेट वस्तू देण्याची पंरपरा आहे. ती मोडू नये. यासाठी कायद्याला धरुन भेट वस्तू देण्यात यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पालिका राबविणार वैद्यकीय सहाय योजना
पुणे महापालिकेमध्ये गरीब, वैद्यकीय सहाय्य योजना राबविली जाते. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका देखील योजना राबविणार आहे. त्यासाठी पुणे पालिकेच्या या योजनेचा अभ्यास करुन त्याचा सविस्तर अहवाल स्थायीला देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button