breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक संकटात सापडलेल्या शहरवासीयांना सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ

पिंपरी – चिंचवड | प्रतिनिधी |

कोरोना साथीमुळे शहरातील लहान-मोठे सर्वच उद्योग लॉकडाऊन कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील अनेक संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे मालमत्ता करात सवलत देण्याबाबत मागणी केली होती. त्या अनुषंगाने शहरवासीयांना महापालिकेमार्फत दिलासा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने त्याचा लघुउद्योजकांसह कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या वर्गाला महापालिकेचा मालमत्ताकर भरणे अतिशय जिकीरीचे होत आहे.

शहरातील वापरनिहाय मालमत्ता!
निवासी – 4, 50,168
बिगरनिवासी – 47,009
औद्योगिक – 3702
मोकळ्या जमीन – 8838
मिश्र – 15,848
इतर – 5,222
————————
एकूण- 5,30,787

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button