breaking-newsक्रिडा

बटलरचा दणका ; राजस्थानची चेन्नईवर मात

जयपूर : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे आव्हान कायम आहे. शुक्रवारी राजस्थानने चेन्नईचा चार गडी राखून पराभव केला. चेन्नईचे १७७ धावांचे लक्ष्य राजस्थानने सहा विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. जॉस बटलर हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ६० चेंडूत नाबाद ९५ धावांची खेळी केली.

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना पार पडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला २० षटकांत ४ गडी गमावून १७६ धावा करता आल्या. सलामीवीर शेन वॉटसनने ३९ धावांची खेळी केली. तर सुरेश रैनाने ५२ धावांची खेळी करत संघाचा डाव पुढे नेला. रैनाने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. यात सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. धोनीने २३ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली.

१७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात दमदार झाली. जॉस बटलर आणि बेन स्ट्रोक्स ही जोडी सलामीला आली. बटलरने फटकेबाजी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी ४८ धावांवर फोडण्यात चेन्नईला यश आले. स्ट्रोक्स ११ धावांवर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेही ४ धावांवर बाद झाला. यामुळे राजस्थानवरील दबाव वाढला. संजू सॅमसनही २१ तर प्रशांत चोप्रा ८ धावांवर माघारी परतले. त्यामुळे बटलरचा वेगही मंदावला. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत १२ धावांची आवश्यकता होती. पण बटलर मैदानात असल्याने राजस्थानने पाच चेंडूमध्ये १२ धावा केल्या आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button