breaking-newsक्रिडा

चंद्रकांत पंडीत यांचा विदर्भाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

आपल्या धुर्त आणि चाणाक्ष रणनितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, विदर्भ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. तब्येतीचं कारण देत पंडीत यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पंडीत यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिलेली आहे. पंडीत यांनी आपल्या पदावर कायम रहावं यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी प्रयत्न करत आहेत, मात्र पंडीत यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचं नक्की केलेलं आहे.

“गेली दोन वर्ष चंद्रकांत पंडीत विदर्भाच्या संघाला प्रशिक्षण देत आहेत. या काळात पंडीत यांना सतत मुंबई ते नागपूर प्रवास करावा लागत होता. या काळात आपल्या परिवाराला पुरेसा वेळ देऊ शकलो नसल्याने आपण थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे.” विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाच्या संघाने सलग दोनवेळा रणजी आणि इराणी करंडकाचं विजेतेपद पटकावलं आहे.

मुंबईचे प्रशिक्षक असणाऱ्या पंडीत यांनी दोन वर्षांपूर्वी विदर्भाच्या संघाची जबाबदारी स्विकारली होती. मुंबईचा अनुभवी खेळाडू वासिम जाफला, विदर्भाच्या संघात आणण्यामध्येही पंडीत यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पंडीत यांच्या राजीनाम्यानंतर कोणता उमेदवार त्यांची जागा घेईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल असं, विदर्भ क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button