breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला; म्हणाल्या, वय हा केवळ आकडा..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. अजित पवार यांनी थेट शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत काळानुसार राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असं सुनावले. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता सुप्रिया सुळेंनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काही लोक आता वय झाल्याने जेष्ठ नेत्यांनी केवळ आशिर्वाद द्यावेत असा सुर आवळत आहेत. पण वय हा केवळ आकडा आहे. तुम्ही २०१९ चा इतिहास विसरला असाल, आम्ही विसरलो नाही. भर पावसात शरद पवार यांनी सभा गाजवली. त्यानंतर सर्व बाजी पालटली. आम्ही पक्ष पुन्हा बांधू.

हेही वाचा – मला लोकांसमोर नेहमी व्हिलन का केलं जातं? अजित पवारांचा थेट शरद पवारांवर निशाणा

जे मुलं आपल्या वडिलांना, घरी बसून तुम्ही आता आशिर्वाद द्या, असा सल्ला देतात, त्यापेक्षा मुली परवडल्या. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धाऊन येतात. जे गेले त्यांना शुभेच्छा, असंही टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

नंतरच्या काळात आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना..चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरूस्ती करून पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या सामाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती. तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं, असं अजित पवार म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button