breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीथडी जत्रेसाठी भोसरीतील महिला बचतगटांना अर्ज करण्याचे आवाहन 

पिंपरी, (महाईन्यूज) – भोसरीत मतदारसंघातील रहिवाशी असलेल्या महिला, महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पुजा महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांजली सखी मंच आयोजित महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव घेण्यात येणार आहे. जत्रेतील स्टॉलसाठी महिला, बचतगटांना अर्ज वाटप सुरु केले असून भोसरी मतदारसंघातील महिलांना 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव गतवर्षीपासून सुरु केला आहे. भोसरीतील गावजत्रा मैदानावर हा महोत्सव घेतला जातो. पुजा महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवांजली सखी मंचच्या आयोजनातर्गत गेल्यावर्षी अतिशय सुरेख नियोजन केले होते. गेल्यावर्षी जत्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली होती. बचतगटांना मोठा फायदा झाला होता.  यंदा देखील जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी यंदा लवकरच अर्ज मागविले आहेत.

जत्रेच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते. इंद्रायणीथडी जत्रे मध्ये महिला बचतगटांना वस्तू विक्रीकरिता मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतात.

इंद्रायणीथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत 750 अर्ज प्राप्त झाले आहेत. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता 20 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जाची सप्टेंबर महिन्यात छाननी केली जाणार आहे. छाननी करुन महिलांना लकी ‘ड्रा’ पद्धतीने स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील महिलांनी 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शिवांजली सखी मंच अध्यक्षा सौ पूजा महेश लांडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button