breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

झायडस कॅडिलाच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली- झायडस कॅडिलाच्या ‘जॉयकोव्ह-डी’ या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे. ही लस 12 वर्षे आणि त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाईल, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे.

अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने 1 जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) मंजुरी मागितली होती. त्यानंतर या लसीला मान्यता देण्यात आली आहे. या लसीची भारतात सर्वांत मोठी चाचणी घेतली गेली होती. 50 हून अधिक केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. याप्रकारे एखाद्या भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील ही पहिलीच डीएनएवर आधारित असलेली लस आहे असा दावा झायडसने केला आहे. या लसीचे तीन डोस द्यावे लागणार आहेत. देशात आतापर्यंत सिरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अ‍ॅँड जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. आता झायडसच्या लसीला मान्यता मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढा आणखी बळकट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button