TOP Newsताज्या घडामोडीपुणे

 ‘सिमरीसर्च २०२२’चे सिम्बायोसिसतर्फे आयोजन

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे लवळे येथील शैक्षणिक संकुलात ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य आणि जैव-वैद्यकीय विज्ञान संशोधन या विषयावर ‘सिमरीसर्च २०२२’ ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग परिषदेच्या उद्घाटनाला, तर आयुषमंत्री एस. सोनोवाल समारोपाला उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी ही माहिती दिली. ‘संशोधनाचे संशोधन’ या विषयावर होणाऱ्या या परिषदेत आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉ. सी. जी. पंडित, डॉ. रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, भारताचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी, सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे आदींचा परिषदेत सहभाग आहे. अधिक माहिती https://symresearch.siu.edu.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button