TOP Newsताज्या घडामोडीपुणे
मुंढव्यात डंपरच्या धडकेने युवकाचा मृत्यू
![Youth dies after being hit by a dumper in Mundhavya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Model-Sucide-780x470.jpg)
मुंढवा परिसरात डंपरच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सूरज राजू हातेकर (वय १७, रा. दळवीनगर, बीटी कवडे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
सूरज आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरुन निघाले होते. सूरजची अल्पवयीन मैत्रीण दुचाकी चालवत होती. मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून ते जहाँगीरनगरकडे निघाले होते. त्यावेळी समोरून चाललेल्या डंपर आणि रिक्षाला ओलांडून सूरजच्या मैत्रिणीने दुचाकी पुढे नेली. भरधाव वेगामुळे सूरजच्या मैत्रिणीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि सूरज खाली पडला. त्यावेळी डंपरच्या धडकेने सूरज गंभीर जखमी झाला. अपघातानंतर सूरजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे करत आहेत.