पिंपरी / चिंचवड

शस्त्र बाळगल्या  प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली. त्यांच्याकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 20) रात्री दहा वाजता चिंचवड मधील आनंदनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

ऋषिकेश उर्फ सोन्या नवनाथ सलगर (वय 22, रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड), बंटी उर्फ किरण खरात (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड येथे शुक्रवारी रात्री स्वतःजवळ कोयता बाळगला. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून ऋषिकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button