पिंपरी / चिंचवड

पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शस्त्र विरोधी पथकाने संशयावरून एका दुचाकीस्वाराला अडवले आणि चौकशी केली. त्यात तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहवाज्ता च-होली येथील शंकराच्या मंदिराजवळ करण्यात आली.

अरुण उर्फ किरण धनराज पवार (वय 27, रा. तुळापुर, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव वाडेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संशयितपणे जाताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याची आणि गाडीची झडती घेतली. त्यावेळी सीटखाली एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button