breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

होय, ती माझी गर्लफ्रेंड आहे!; के एल राहुलचा खुलासा

नवी दिल्ली – क्रिकेट जग आणि बॉलीवुड यांची प्रेमाची वीण सर्वश्रुत आहेच; पण आणखी एका कपलने ही वीण घट्ट केली आहे. ते कपल म्हणजे के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी.गेल्या अनेक दिवसांपासून के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. दरम्यान, के एल राहुल या चर्चेला दुजोरा दिला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आणि चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत नेण्याची मुभा दिली होती.यंदा या कुटूंबामध्ये अथिया देखील सहभागी झाली आहे.

के एल राहुलने दिली प्रेमाची कबुली
इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं खेळाडूंकडे त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मागितली होती. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, के एल राहुलने त्यात अथियाला आपली गर्लफ्रेंड असल्याचे बासीसीआयला कळवले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

क्रिकेटर के एल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टी म्हणतो …
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीला या दोघांच्या नात्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता अथिया खरंच राहुलला कंपनी द्यायला इंग्लडला गेली आहे का? असा प्रश्न सुनिलला विचारण्यात आला होता.यावंर सुनील शेट्टी म्हणाला की, ”या सगळ्यावर माझ्याकडे कमेंन्ट करायला काहीच नाही आहे. सुनील शेट्टीने या प्रश्नावर मौन बाळगणं पसंत केलं.

बायो बबलमधून अथिया केएल राहुलसोबत इंग्लंडमध्ये दाखल
मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी लोकेश राहुल व अथिया दोघंही एकत्र इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत.इंग्लंडला जाण्यापूर्वी लॉजिस्टीक विभागानं खेळाडूंकडून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे विचारली. तेव्हा केएल राहुलने अथिया शेट्टी ही त्याची पार्टनर असल्याचे सांगितले. त्याच बायो बबलमधून ती इंग्लंडमध्ये दाखल झाली अन् संघासोबतच साऊदॅम्प्टन येथे राहत आहे.

मागील महिन्यात अथियाने के एल राहुलसोबत आपल्या इन्स्टा अकाऊंट फोटो शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/CQLAUCWnrWa/?utm_source=ig_embed&ig_rid=c5fb5a00-5938-49c7-93e0-dd15c92d0b7a

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button