breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘ये है मोहब्बते’ फेम बालकलाकार रुहानिका धवनने 15 व्या वर्षीच खरेदी केलं कोट्यवधींचं आलिशान घर

मुंबई : आजकाल प्रत्येक मालिकेत एक ना दोन बालकलाकार काम करत आहेत. मराठी प्रमाणेच हिंदी मालिकांमधील बालकलाकारांना सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळते. मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता या बालकलाकरांना नाव, पैसा फेम या तिनही गोष्टी मिळत आहेत. मालिकेमुळं प्रचंड लोकप्रिय झालेली अशीच एक बालकलाकार म्हणजे रुहानिका धवन. रुहानिकानं ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर हि रुही घराघरात प्रसिद्ध झाली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये. त्याच कारण म्हणजे तिनं वयाच्या पंधराव्या वर्षीच कोट्यवधींचं घर खरेदी केलं आहे.

रुहानिकानं ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. रुहानिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घर खरेदी केल्याचं चाहत्यांसोबत शेअर केलंय. तसंच एक खास सीक्रेटही सांगितलं. की, केवळ १५ व्या वर्षी तिनं घर कसं काय खरेदी केलं. रुहानिका धवनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन घर घेतल्याची घोषणा करत हे घराची एक झलक दाखवली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला आनंद शेअर करताना घर घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे देखील सांगितले आहे. रुहानिकाने चाहत्यांना असेही सांगितले की, जर ती तिची स्वप्ने पूर्ण करू शकते तर इतरही करू शकतात.

रुहानिका धवनने लिहिले आहे की, ‘वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, मी माझा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. एक नवीन सुरुवात. माझे हृदय आनंद आणि प्रेमाने भरले आहे आणि मी अत्यंत आभारी आहे. माझे एक स्वप्न मी पूर्ण केले आहे. मी स्वतःचे घर घेतले आहे. हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे. म्हणूनच मला ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे होते. मला मिळालेल्या सर्व प्लॅटफॉर्म आणि संधींसाठी मी आणि माझे पालक आभारी आहोत आणि त्यांच्यामुळेच मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button